१९९१-९२ सालच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील हलकर्णी भाग हायस्कूल व कडलगे हायस्कूल कडलगे येथे मार्च १९९१-९२ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविला. शाळेतील इयत्ता पाचवी, सातवी, आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांना वह्या आणि पेन वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक आर. एस. पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या शाळेतील आठवणींना उजाळा देत, सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, शिक्षणाचे महत्त्व समजावले. काही विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कार्यक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मुख्याध्यापक श्री. पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार मानून त्यांनी घेतलेला पुढाकार हा इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक आर. एस. पाटील, ज्येष्ठ शिक्षक आर. एस. मठपती, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.







