Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला ठाकरे शिवसेनेच्या वतीने उद्या रक्तदान शिबिर व ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन 


रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा : अजित खोत




गडहिंग्लज (प्रतिनिधी): रविवार दिनांक २७ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गडहिंग्लज तालुका शिवसेना, युवासेना व अंगीकृत संघटना यांच्या वतीने रक्तदान शिबीर व जेष्ठ शिवसैनिक यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. हा कार्यक्रम गडहिंग्लज नगरपालिकेच्या शाहू सभागृहात सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख अजित खोत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व पदाधिकारी, शिवसैनिक यांच्यासह रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन शिवसेनेचे गडहिंग्लज तालुका प्रमुख अजित खोत यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.