Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शाळकरी मुलांची व्यसनाधीनता समाजासाठी घातक : प्रा.आशपाक मकानदार

गडहिंग्लजला जागृती हायस्कूलमध्ये संस्कार शिबीर


गडहिंग्लज : जागृती प्रशालेत संस्कार शिबिर मार्गदर्शन करताना प्रा. अशपाक मकानदार, श्रीरंग तांबे, बी.जी. कुंभार, अनिल मसाळे.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): शाळकरी मुलांच्यामध्ये वाढत असलेली व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी ही समाजासाठी घातक असल्याचे मत प्रा.आशपाक मकानदार यांनी येथील जागृती हायस्कूलमध्ये मुख्यमंत्री गतिमान प्रशासन, संस्कार शिबिर अभियान अंतर्गत 'व्यसनमुक्ती काळाची गरज' या विषयावर बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्रीरंग तांबे होते.

             


स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख क्रीडा शिक्षक संपत सावंत यांनी करून दिली. यावेळी प्रा. मकानदार पुढे म्हणाले, 'मावा, गुटखा, मद्य यासारख्या व्यसनाबरोबर गांजा, अफूचे सेवन करण्यामध्ये शाळकरी मुलांचा वाढता सहभाग ही चिंताजनक बाब आहे. पेन हुक्का, इलेक्ट्रिक सिगारेट, व्हाइटनर, सोल्युशन बाम, रंग यांसारख्या पदार्थांचे व्यसन करण्याची नवी क्रेझ तरुणांमध्ये आली आहे. यामुळे तोंडाचा, घशाचा, मेंदूचा, फुफुसाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढत आहे. व्यसनापासून दूर राहण्यासाठी मुलांनी चांगली संगत करणे, चांगले वाचन व नियमित व्यायाम करणे आणि पालकांशी सुसंवाद ठेवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. श्रीरंग तांबे यांचेही अध्यक्षीय भाषण झाले. 

            


अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मिरज तर्फे तबलावादन परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला स्वरूप लोहार याचा सत्कार झाला. यावेळी उपमुख्याध्यापक बी.जी. कुंभार, अनिल मसाळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ वरोटे यांनी तर कुमार सुबुद्ध कांबळे यांनी आभार मानले. 



गडहिंग्लज : जागृती प्रशालेत संस्कार शिबिर मार्गदर्शन करताना प्रा. अशपाक मकानदार, श्रीरंग तांबे, बी.जी. कुंभार, अनिल मसाळे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.