अथर्व बुटे, सागरीका सूर्यवंशी, संदीप भुसूरी, कु. सेजल पाटील विजेते
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज नगरीचे भूषण, माजी नगराध्यक्ष माजी आमदार विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. एस. एस. घाळी यांची १०५ वी जयंती व जागतिक बुद्धिबळ दिनाचे औचित्य साधून शाळा अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धा डॉ. घाळी सांस्कृतिक सभागृहामध्ये अतिशय उत्साही वातावरणात पार पडल्या.
स्वागत प्रवीण पाटील यांनी तर स्पर्धाप्रमुख संपत सावंत यांनी स्पर्धेचा येतो स्पष्ट केला. स्पर्धेचे उदघाटन स्व. एस. एस. घाळी यांच्या प्रतिमेचे पूजन व बुद्धिबळ पटाच्या पूजनाने झाले. मुख्याध्यापक श्रीरंग तांबे यांनी डॉ. घाळी यांच्या कार्याविषयी माहिती देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. जागतिक बुद्धिबळ दिनाचे महत्त्व क्रीडाशिक्षक संपत सावंत यांनी विषद केले. या स्पर्धेत लहान व मोठ्या गटातील १४७ मुला मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अनुक्रमे स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -लहान गट -मुले अथर्व बूटे ,कल्पित पाटील, अभिजीत बिरंजे, केतन माने, समर्थ मदकरी, मुली- कुमारी सागरीका सूर्यवंशी, कुमारी श्रुतिका पाटील, कुमारी कस्तुरी चाळक, कुमारी आर्या पाटील कुमारी स्वरा खवरे, मोठा गट -मुले- संदीप भुसूरी, विराट शेवाळे, अथर्व पाटील, अथर्व शेवाळे, समर्थ शिंदे, मुली- कु .सेजल पाटील, कु. केतकी माने, कुमारी जान्हवी जाधव, कुमारी तन्वी देसाई, कुमारी अनुष्का देसाई.
विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व मेडल्स मुख्याध्यापक श्रीरंग तांबे, अनिल मसाळे, महंतेश दड्डी,राष्ट्रीय धावपटू कुमारी ममता पाटील, प्रा. संकेत बेल्लद, प्रा. विकास अतिग्रे, प्रा. दयानंद ग्वाडी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रवीण पाटील, संपत सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा मोरे हिने तर आभार सुभाष टिप्प यांनी मानले.


