गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी भाग हायस्कूल तालुका गडहिंग्लज हलकर्णी भाग हायस्कूल येथे शालेय जिमखाना निवडणूक अत्यंत आधुनिक पद्धतीने पार पडली. निवडणूक प्रक्रिया पारंपरिक मतपेटी ऐवजी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) सिम्युलेटर अॅपद्वारे राबवण्यात आली.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचे आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत अनुभव देणे हा होता. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि डिजिटल मतदानाची प्रक्रिया प्रत्यक्षात अनुभवली. प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
मुख्याध्यापक आर. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी सर्व शिक्षक यांच्या देखरेखीखाली निवडणूक पार पडली. या माध्यमातून विद्यार्थी केवळ मतदान प्रक्रियेत सहभागी झालेच नाहीत, तर त्यांना ईव्हीएम वापरण्याची माहिती, पारदर्शकता व मतांची मोजणी कशी केली जाते याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
निवडून आलेल्या विद्यार्थ्यांची नावे व पदे खालीलप्रमाणे -
जी. एस. प्रतिनिधी: राहुल पाटील
विद्यार्थिनी प्रतिनिधी: वैष्णवी बोनी
सांस्कृतिक प्रतिनिधी : सृष्टी शिंत्रे
क्रीडा प्रतिनिधी: अभिजीत सावंत
शालेय पोषण आहार प्रतिनिधी: अश्विन मोरे
आरोग्य प्रतिनिधी: सोहम मठपती
वाचनालय प्रतिनिधी: यासीन सय्यद
सहल प्रतिनिधी: स्नेहल कांबळे
शालेय शिस्त प्रतिनिधी: ऋग्वेद रामाज
विज्ञान व तंत्रज्ञान प्रतिनिधी: साईराज पाटील
पर्यावरण व बाग प्रतिनिधी: यश गुरव
हा उपक्रम शाळेसाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला असून भविष्यात देखील अशाच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. यासाठी पर्यवेक्षक बी.जी. गाडीवड, ज्येष्ठ शिक्षक आर. एस. मठपती, जिमखाना प्रमुख एस. बी.पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.



