गडहिंग्लजच्या जागृती हायस्कूलमध्ये शालेय जिमखाना निवडणूक उत्साहात संपन्न
विद्यार्थी प्रतिनिधी निलेश जाधव तर विद्यार्थिनी प्रतिनिधीपदी समीक्षा मोरे हिची निवड
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शहरातील जागृती हायस्कूलची शालेय जिमखाना निवडणूक लोकशाही पद्धतीने उत्साही वातावरणात पार पडली. लोकशाहीमध्ये ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुकीमध्ये जी प्रक्रिया राबविली जाते तिची ओळख, माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी गुप्त मतदान पद्धतीने वर्ग प्रतिनिधींची निवड करण्यात आली. विद्यार्थी प्रतिनिधी पदासाठी पाच उमेदवार तर विद्यार्थिनी प्रतिनिधी पदासाठी सहा उमेदवार रिंगणात होते. उमेदवारी अर्ज, माघार, छाननी, चिन्ह वाटप,मतदारांची भेट, वचननामा, प्रचार यंत्रणा इत्यादी प्रक्रिया उत्तम पद्धतीने राबविण्यात आल्या, पाचवी ते दहावीच्या जवळजवळ १४१० विद्यार्थ्यांनी गुप्त मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावला. एक व्यक्ती एक मत देऊन थेट पद्धतीने प्रशालेचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निलेश जाधव हा १२९ मतांनी तर विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी समीक्षा मोरे ही अवघ्या २७ मतांनी विजयी झाली. निवडणुकीनंतर विद्यार्थ्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांना खांद्यावर उचलून घेऊन जयघोषाने विजयी मिरवणूक काढण्यात आली.
निवडून आलेले वर्गवार प्रतिनिधी पुढीलप्रमाणे: आदर्श पाटील, कुमारी भक्ती पाटील, समर्थ शिरोलीकर, कुमारी अलिझा पाटील, अभिनव मराठी, कुमारी वैष्णवी कानडे, समर्थ माळवी, कुमारी संस्कृती दिवेकर, समर्थ पावले, कुमारी सेजल गोरुले, श्रेयस निळपणकर, कुमारी स्वरा दिवेकर, श्रेयश भोई, कुमारी आयुष्य मिसाळ, सिद्धेश सुतार, कुमारी श्रेया मोर्ती, संघर्ष कांबळे, कुमारी स्नेहा दळवी, भार्गव गवळी, कुमारी समीक्षा गाडीवड्ड,आयुष्य क्षीरसागर, कुमारी अनुष्का मिरजे, चिन्मय पवार,कुमारी शर्वरी सागर, श्रेयस मुरगुडे, कुमारी चैत्राली मठपती, प्रज्वल पाटील, कुमारी लावण्या काळेर्बेरे, आकाश शिंत्रे,कुमारी आर्या मांगले, प्रणव कोरे, कुमारी चिन्मयी पन्नोरे, संस्कार चौगुले, कुमारी आदित्यी पाटील, निरज हवालदार, कुमारी श्रावणी बसर्गे, समर्थ जाधव, कुमारी अमृता पाटील, श्रेयस उपाशे, कुमारी सुकन्या जरळी,रोहन पाटील, कुमारी श्रेया भोई ,रणवीर भालकर कुमारी मधुरा दबडे ,प्रमोद कुंभार, कुमारी प्रियंका कित्तुरकर ,सुयश घेज्जी, कुमारी श्रीजा गायकवाड, राजवर्धन जामदार,कुमारी स्वरांगी गावडे.
निवडणुकीच्या निकालानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी, गजेंद्र बंदी, महेश घाळी,श्रीरंग तांबे,अनिल मसाळे, महंतेश दड्डी यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी, जिमखाना विभाग प्रमुख संपत सावंत सचिन मगदूम प्रकाश हरकारे यांनी विशेष परिश्रम घेतले.




