संस्कार शिबिर अंतर्गत प्रशालेत विविध स्तुत्य उपक्रम
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील साधना प्रशालेत मुख्यमंत्री गतिमान प्रशासन अभियानांतर्गत संस्कार शिबिर नियोजन (पहिला व तिसरा शनिवार ) अंतर्गत क्षेत्रभेट व राखी तयार करणे कार्यशाळा भरवण्यात आली. यावेळी प्रशालेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी आकर्षक राख्या तयार करून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. तयार केलेल्या या राख्या भारतीय सैनिकांना सुपूर्द करण्यात आल्या. सदर उपक्रमामध्ये हवालदार रसविंदर सिंग यांनी 'देशसेवा आणि देशाभिमान' याविषयी मनोगत व्यक्त केले.
या उपक्रमाला प्राचार्य आय.पी. कुटिन्हो, पर्यवेक्षक ए. जे. बारदेस्कर यांचे प्रोत्साहन मिळाले. एन.सी.सी. विभाग प्रमुख विनय नाईक यांनी या उपक्रमाचे नियोजन केले. सतीश कांबळे, शितल भवारी व शितल हरळीकर यांनी मुलींना राख्या कशा तयार कराव्यात याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास हवालदार सत्येंद्रसिंग, नायब सुभेदार दुर्गेशकुमार, तानाजी पाटील उपस्थित होते.


