मुंबईतील शिवसेना भवनात नियुक्तीपत्र प्रदान
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील श्रीशैलाप्पा महादेव साखरे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिव सहकार सेनेच्या कोल्हापूर जिल्हा ( पश्चिम विभाग) संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र सहकार सेनेच्या अध्यक्षा शिल्पा सरपोतदार यांनी श्री. साखरे यांना मुंबई येथील शिवसेना भवनात प्रदान केले.
यावेळी उपाध्यक्षा रंजनाताई नेवाळकर, पश्चिम महाराष्ट्र संपर्क संघटक चंद्रकांत नेवरेकर, सरचिटणीस संदीप तांबे, शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत उपस्थित होते.


