Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजऱ्यातील भाई भाई थिएटर जवळील रस्ता स्वच्छ करून दुरुस्त करा - जावेद पठाण



आजरा (हसन तकीलदार ) : आजरा शहर व उपनगरातील खड्डे मुजवणे व सर्वत्र औषध फवारणी करणे याबरोबरच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले श्रद्धास्थान हजरत दावल मलिक बाबा दर्गाह तसेच डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजकडे जाण्यासाठी भाई भाई थिएटरच्या बाजूचा रस्ता दुरुस्त करून स्वच्छ करावा अशी मागणी आजरा अन्याय निवारण समितीचे अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जावेद पठाण यांनी केली आहे.

      


डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कुलचे विद्यार्थी -विद्यार्थिनी तसेच हजरत दावल मलिकबाबा दर्गाहकडे जाण्यासाठी आजरा पेट्रोल पंप समोरील व भाई भाई थिएटर बाजूच्या पाणंद रस्त्याचा वापर कित्येक वर्षापासून केला जात आहे. परंतु या रस्त्याची डागडुगी व स्वछता न केल्यामुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य झाले आहे. त्याचप्रमाणे काही हॉटेल व्यवसायिक व चिकन दुकानवाले या रस्त्याच्या दुतर्फा व नाल्यात शिल्लक अन्न व तसेच प्लास्टिक कचरा टाकत आहेत. त्यामुळे अन्न व इतर पदार्थ खाण्यासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री येत आहेत. ही भटकी कुत्री शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडण्याअगोदर यावर उपाय आखणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे यावर्षी अतिपावसामुळे या रस्त्यावर उगवलेली झुडपे तोडून स्वच्छ करावीत तसेच या ठिकाणी जे हॉटेलवाले व चिकन दुकानवाले कचरा टाकून दुर्गंधी पसरवत आहेत आणि लोकांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेऊन सूचना कराव्यात आणि पावसामुळे पडलेल्या चरिमध्ये मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी अन्याय निवारण समितीचे अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जावेद पठाण व अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.