गडहिंग्लज (प्रतिनिधी): अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या तबला वादन परीक्षेत गडहिंग्लज येथील ताल साधना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
मध्यमा पूर्ण परीक्षेत सिद्धार्थ हरळीकर, प्रथमेश हावळ, आशिष कुलदीप, अभंग देसाई, प्रणव पाटील, वैभव कुंभार या विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली.
मध्यमा प्रथम परीक्षेत स्वरूप दत्तात्रय लोहार याने प्रथम श्रेणी प्राप्त केली.
प्रवेशिका पूर्ण परीक्षेत श्रिया परीट- प्रथम श्रेणी, रवी नारायण पाटील - द्वितीय श्रेणी व आदेश बस्ताडे - पहिला श्रेणी मिळवून यश संपादन केले.
प्रवेशिका प्रथम परीक्षेत श्रीजीत देवार्डे प्रथम श्रेणी, गौरव खरात - विशेष योग्यता, श्रीविराज कोपार्डे - प्रथम श्रेणी, अभिमन्यू सरदेसाई- प्रथम श्रेणी, वल्लभ फडणीस- प्रथम श्रेणी, श्रीतेज पाटील-प्रथम श्रेणी
प्रारंभिका परीक्षेत प्रांजल सावंत-विशेष योग्यता, वेदिका सावंत प्रथम श्रेणी, स्वराज परीट-प्रथम श्रेणी,
यश शहापुरकर-प्रथम श्रेणी, प्रज्ञा पोटे- विशेष योग्यता, श्रेयश खवरे प्रथम श्रेणी, यश शेडगे - प्रथम श्रेणी, अथर्व हुक्केरी- प्रथम श्रेणी, शौर्य बागडी - प्रथम श्रेणी, कौस्तुभ साळगावकर - विशेष योग्यता या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संभाजी परीट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

