गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुत्नाळ येथील श्री दुरदुंडेश्वर हायस्कूल येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेमार्फत अभिवादन करण्यात आले.
प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी अनावरे व उपमुख्याध्यापक बी.जी कुंभार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुहास पुजारी यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला.
स्मिता पाटील, सृष्टी मुरगी, सरस्वती झमरी, श्वेता गवळी, समर्थ चिनगी, निखिल मुरगी, वैष्णवी काळाई, शिवानी गवळी, संग्राम घाटगे या विद्यार्थ्यांनी मनोगतातून लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य मांडले.
यावेळी राजेंद्र पाटील, पार्वती पाटील,बाळासाहेब खरात, कल्पना पाटील विजयकुमार शेडगे, दत्ता लोहार, शेखर गवळी, पुंडलिक पाटील आदी शिक्षक उपस्थित होते.




