गडहिंग्लजला "विद्या प्रसारक"तर्फे सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव

गडहिंग्लज : डॉ. एम.डी. पुजारी यांचा सत्कार करताना डॉ. सतीश घाळी, अरविंद कित्तुरकर, अँड.बाबुराव भोसकी, किशोर हंजी, गजेंद्र बंदी.
गडहिंग्लज ( संपत सावंत) : शिक्षक हा समाज परिवर्तनाचा शिल्पकार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भरभक्कम पाया रचत त्यांच्यावर संस्कार करतो. शाळेचा सर्वांगीण विकास हा शिक्षकांची संघ भावना, समर्पण आणि टीमवर्क मधूनच शक्य होतो असे प्रतिपादन डॉ. सतीश घाळी यांनी विद्या प्रसारक मंडळामार्फत आयोजित सेवानिवृत्ती शिक्षक शुभेच्छा सत्कार प्रसंगी केले.
![]() |
| गडहिंग्लज : जागृती प्रशालेतील उपमुख्याध्यापक बी.जी. कुंभार यांचा सत्कार करताना अरविंद कित्तुरकर. |
स्वागत व प्रास्ताविक गजेंद्र बंदी यांनी केले. सेवानिवृत्त डॉ. घाळी कॉलेजचे डॉ. एम.डी. पुजारी, उपमुख्याध्यापक बी.जी. कुंभार, जागृतीचे सहा. शिक्षक एस.एम.गडकरी यांचा सपत्नीक तर जागृती प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती माला आजरी यांचा सत्कार डॉ. सतीश घाळी,अरविंद कित्तुरकर, अँड .बाबुराव भोसकी, इंजि. किशोर हंजी यांच्या हस्ते करण्यात आला.
![]() |
| गडहिंग्लज : जागृती प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती माला आजरी यांचा सत्कार करताना अँड.बाबुराव भोसकी व गजेंद्र बंदी. |
डॉ. सतीश घाळी पुढे म्हणाले,' सेवानिवृत्तीनंतर आपण कुटुंबीया समवेत भारत भ्रमण करा, मित्र परिवारासाठी, समाजासाठी, नातेवाईकासाठी वेळ द्या. आपल्या अनुभवाचा लाभ समाजाला मिळेल असे आदर्श कार्य करा. निवृत्ती म्हणजे थांबणे नव्हे; पुन्हा नव्याने समाजकार्याची सुरुवात करण्याची संधी आहे. जीवनात सतत कृतिशील रहा. बोलण्यावर आणि खाण्यावर नियंत्रण ठेवा म्हणजे आयुष्य अधिक आनंदी, निरोगी होईल.' असे प्रेरणादायी विचार व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना डॉ. एम.डी.पुजारी, बी.जी. कुंभार, एस. एम.गडकरी, श्रीमती माला आजरी यांनी संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करताना सेवा काळातील आठवणींना उजाळा दिला. बसवराज आजरी यांनीही मनोगत व्यक्त केले.
![]() |
| गडहिंग्लज : जागृती हायस्कूलचे सहा. शिक्षक एस.एम. गडकरी यांचा सत्कार करताना इंजि. किशोर हंजी. |
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मलगोंडा पाटील, डॉ. एस.एन. शिंदे, डॉ.दत्ता पाटील, उमेश सावंत, सी.एस. मठपती, श्रीरंग तांबे, जी.एच, गुरव, प्रकाश पाटील, शिवाजी अनावरे, मनोहर गुलगुंजी, विलास शिंदे,प्रा. शंकर खाडे,सौ. सुनीता पाटील, महावीर कासार, दुंडाप्पा घुळण्णावर, प्रा. विद्या पन्हाळे, प्रा.स्वाती क्षीरसागर, सौ. सारिका बनसोडे,अनिल मसाळे, महंतेश दड्डी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]() |
| गडहिंग्लज : विद्या प्रसारक मंडळातर्फे सेवानिवृत्त शिक्षक गौरव सोहळ्यात बोलताना डॉ.सतीश घाळी. |
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिता पाटील, अनिल कांबळे यांनी तर आभार ॲड. बाबुराव भोसकी यांनी मानले.




