Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विद्या मंदिर मेंढोलीत स्वातंत्र्यदिनी डिजिटल पाट्यांचे वाटप; शिष्यवृत्तीप्राप्त श्रावणी सुतारचा विशेष सत्कार

आजरा युथ कव्हरेज फाउंडेशनचा कौतुकास्पद व विधायक उपक्रम




आजरा (हसन तकीलदार) : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक भान जपणाऱ्या ‘आजरा युथ कव्हरेज फाउंडेशन’च्या वतीने विद्या मंदिर मेंढोली (ता. आजरा) येथे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात स्तुत्य उपक्रम राबवून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देणे व त्यांच्या उज्ज्वल भविष्याला हातभार लावण्याच्या उदात्त हेतूने येथील विद्यार्थ्यांना डिजिटल पाट्यांचे वितरण करण्यात आले.


डिजिटल युगाची गरज ओळखून शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना मॉडर्न शैक्षणिक साधनांची सवय व्हावी, या उद्देशाने फाउंडेशनने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. या वेळी शाळेच्या वतीने फाउंडेशनच्या या पुढाकाराचे आभार मानण्यात आले.


शिक्षणातील गुणवत्तेचा गौरव!


 विद्या मंदिर मेंढोलीची विद्यार्थिनी कु. श्रावणी सुतार हिने शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी तब्बल २७० गुण मिळवून उत्तम यश संपादन केले व शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून फाउंडेशन व ग्रामस्थांच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला. श्रावणीचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.



या सोहळ्यास सामाजिक कार्यकर्ते बुरहान खेडेकर, जुबेर बागवान, सुजल कांबळे, मुआज काकतिकर, आफताब लाडजी, मुआज नेसरीकर, अजीम लमतुरे, बुरहान शेख यांच्यासह शाळेचे शिक्षकवृंद, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्वातंत्र्यदिनासारख्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी केवळ ध्वजरोहणापुरते मर्यादित न राहता, आजरा युथ कव्हरेज फाउंडेशनने सामाजिक दायित्वातून राबवलेल्या या शैक्षणिक उपक्रमामुळे मेंढोली परिसरातून फाउंडेशनच्या युथ टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.