गडहिंग्लज (प्रतिनिधी ) : येथील साधना हायस्कूलमध्ये गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी 'हर घर तिरंगा' रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेटस सहभागी झाले होते.
या रॅलीमध्ये सर्व एनसीसी (NCC) कॅडेट्सनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन देशभक्तीपर घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातून आणि शहराच्या रस्त्यांवरून रॅली काढली. संपूर्ण वातावरण देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेने भारलेले होते.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद बारदेसकर, पर्यवेक्षक बी. एन. वाघमारे आणि लष्करी जवान व परेड प्रशिक्षक कार्तिक सर, गर्ल्स एनसीसी अधिकारी गीता नातलेकर आदी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी व कॅडेट्सना मार्गदर्शन केले आणि राष्ट्रसेवा व एकता जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कॅडेट्स आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजवणे, स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता व एकतेचा संदेश देणे हा या रॅलीचा उद्देश होता.


