Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विकास सेवा संस्थांच्या कारभारात पारदर्शकता: 'मानवता फाउंडेशन'च्या मोफत पासबुक उपक्रमाला तेरणीत यश!

तेरणीच्या संगमेश्वर सेवा संस्थेकडून सर्व माहिती भरून पासबुक वितरणाचे आश्वासन




गडहिंग्लज (प्रतिनिधी): शेतकरी बांधवांना त्यांच्या संस्थेकडील व बँकेकडील कर्जाची अचूक रक्कम, शेअर्स, आकारलेले व्याज आणि शिल्लक बाकीची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी मिळून आर्थिक व्यवहारांमध्ये पूर्ण पारदर्शकता यावी यासाठी बुगडीकट्टी येथील 'मानवता फाउंडेशन'तर्फे सुरू केलेल्या विनामूल्य पासबुक वितरण अभियानाला पूर्व भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत आता तेरणी येथील विकास सेवा संस्थेला पासबुकांचे वाटप करण्यात आले असून संस्थेने या सर्व पासबुकांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जाची व व्यवहारांची संपूर्ण अचूक माहिती नोंदवून ती शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन दिले आहे.


मानवता फाउंडेशनतर्फे गडहिंग्लज परिसराच्या पूर्व भागातील सुमारे ३० हजार शेतकरी बांधवांना मोफत पासबुक देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापूर्वी श्री संगमेश्वर सेवा संस्थेने या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आता या विकास सेवा संस्थेनेही पुढाकार घेतला आहे.


संस्थेच्या या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या खात्यावरील शिल्लक, व्याज आणि शेअर्सची माहिती सुलभरीत्या मिळण्यास मदत होईल. पासबुकमधील अधिकृत नोंदींमुळे सेवा संस्था आणि शेतकरी यांच्यातील विश्वासार्हता अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.



तेरणी येथील या उपक्रमप्रसंगी आणि पासबुक सुपूर्द करताना सुनील तोडकर, रियाज जमादार, करवीर नद्यापगोळ, राजू गंधनवाले, संस्थेचे सचिव श्री. खामकर, व्यंकटेश देसाई-इनामदार आणि दूंडाप्पा चौगुले यांचा समावेश होता. मानवता फाउंडेशनच्या या शेतकरीहिताच्या उपक्रमाचे आणि तेरणी विकास सेवा संस्थेच्या सहकार्याचे शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.