Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संगीतमय कवायती अन्‌ देशप्रेमाच्या घोषणांनी गडहिंग्लज दुमदुमले!

'जागृती'मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात


नशामुक्तीसह कॉपीमुक्तीची घेतली सामूहिक शपथ




गडहिंग्लज (संपत सावंत ): राष्ट्रभक्तीचा अमाप उत्साह, शिस्तबद्ध संगीतमय कवायतीचे नेत्रदीपक प्रात्यक्षिक आणि सामाजिक भान जपणारी कॉपी व नशामुक्तीची शपथ... अशा अत्यंत देशभक्तीपर वातावरणात जागृती हायस्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी काढण्यात आलेल्या प्रभातफेरीतील जोशपूर्ण घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.


विद्या प्रसारक मंडळ संचलित जागृती हायस्कूल व डॉ. घाळी महाविद्यालयाच्या प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर वंदे मातरम, राष्ट्रगीत व राज्यगीत झाले. एनसीसी कॅडेट्सने राष्ट्रीय ध्वजास आकर्षक संचलन करत मानवंदना दिली.



शाळेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर आणि ढोल-ताशांच्या गजरात सादर केलेल्या संगीतमय कवायतींनी उपस्थितांची मन जिंकली. विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. अमृता पाटील हिने सर्वांना 'कॉपीमुक्ती'ची, तर अनिल कांबळे यांनी 'नशामुक्ती'ची सामुदायिक शपथ दिली. यानंतर शहरातून काढण्यात आलेल्या भव्य प्रभातफेरीत विद्यार्थ्यांनी 'तिरंगा आमचा अभिमान, भारत देश महान', 'शान तिरंग्याची, आन भारताची' अशा विविध घोषणा देत राष्ट्रप्रेमाचा जागर केला.




यावेळी अरविंद कितुरकर, ॲड. बाबूराव भोसकी, गजेंद्र बंदी, ॲड. विकास पाटील, डॉ. शिवकुमार कोल्हापुरे, इंजि. किशोर हंजी, महेश घाळी, डॉ. सुरेश संकेश्वरी, बसवराज हंजी, दादू पाटील, मुरलीधर कांबळे, उमेश सावंत, प्रा. विद्या पन्हाळे, अनिल मसाळे, महंतेश दड्डी, सौ. सारिका बनसोडे, प्रा. नागनाथ मासाळ, प्रा. गुरुलिंग खंदारे, प्रा. मिलिंद पाटील यांच्यासह माजी मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.



प्रास्ताविक  प्राचार्य डॉ. दत्ता पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रा. सरोज बिडकर यांनी केले. आभार ओंकार खटकले यांनी मानले. प्रा. विकास अतिग्रे, संपत सावंत, सचिन मगदूम, प्रकाश हरकारे, प्रा. दयानंद ग्वाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.