Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ईद-ए-मिलादच्या भक्तिमय जयघोषाने हलकर्णी दुमदुमली; आकर्षण ठरली मक्का-मदिनेची प्रतिकृती

हलकर्णीत मुस्लिम सुन्नत जमात व युवा वर्गाकडून पोलिसांचा विशेष सत्कार



हलकर्णी (वार्ताहर): येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने पैगंबर मोहम्मद पैगंबर (स.अ.व.) यांच्या जयंतीनिमित्त 'ईद-ए-मिलाद-उन-नबी' अत्यंत उत्साहात, शांततेत आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.


ईदच्या पूर्वसंध्येला स्थानिक मशिदीमध्ये नाते-पाक, मौलूद आणि विशेष तकरीर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सणाच्या दिवशी सकाळी मशिदीपासून पारंपरिक पद्धतीने भव्य जुलूस (मिरवणूक) काढण्यात आला. ‘नारे तकबीर, अल्लाहू अकबर’च्या जयघोषाने संपूर्ण हलकर्णी परिसर दुमदुमून गेला होता.



यावेळी चिमुकल्या मुलांनी परिधान केलेले सुरेख इस्लामिक पोशाख सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. सुंदर सजवलेल्या ट्रॅक्टरवर साकारलेली मक्का-मदिनेची हुबेहूब प्रतिकृती या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांच्या वतीने नागरिकांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.



या सोहळ्याला हाफिज मोहम्मद मकानदार, शकील पट्टणकुडी, मुस्लिम सुन्नत जमात अध्यक्ष अलीसाहेब कादरभाई, उपसरपंच सलीम यमकनमर्डी, नूर मकानदार, हमीद पानारी, माजी सैनिक इमामहुसेन पानारी, मोहम्मद जमादार, मुख्याध्यापक फैयाज ताशिलदार, हाजी लायकअली मालदार, असगरअली बागवान, गैबू कोनकेरी, इस्माईल यमकनमर्डी, बाबूजावेद ताशिलदार, फारुख हट्टी, राजू खलिफा, सादिक नगारसे, अल्ताफ मुल्ला, युनुस पाकजादे, मीरा पानारी व सलीम कुंदरगी यांच्यासह हलकर्णीतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



पोलिस प्रशासनाचा विशेष सत्कार


मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी चोख कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा मुस्लिम सुन्नत जमात व स्थानिक युवा वर्गाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये पोलिस अंमलदार राजकुमार माने, नितीन डोंगरे आणि उपस्थित होमगार्ड्सचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.