Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज बस डेपोच्या ताफ्यात ५ नवीन एसटी बसेस दाखल; प्रवासी सेवा अधिक गतिमान होणार

मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते थाटात पूजन व लोकार्पण




गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या परिवहन खात्याकडून गडहिंग्लज आगारासाठी ५ नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या नूतन बसेसचा पूजन व लोकार्पण सोहळा आज गडहिंग्लज आगार परिसर (डेपो) मध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या नवीन बसेसचे विधिवत पूजन करून त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या.


या नवीन बसेसमुळे गडहिंग्लज शहर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांना उत्तम वाहतूक सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. गडहिंग्लज आगाराच्या सेवेला अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे.



या लोकार्पण सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर, प्रा. सौ. स्वातीताई कोरी, पंचायत समितीच्या सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण, सतीश पाटील, सिद्धार्थ बन्ने, प्रीतम कापसे, सोमगोंडा आरबोळे, सचिन देसाई, बाळासाहेब देसाई, महादेव नाईक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.