Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजऱ्यात रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची भेट

पक्ष वाढीसाठी 'गाव तेथे शाखा' काढण्याचा निर्णय




आजरा(हसन तकीलदार): रिपब्लिकन सेना पक्षाची नवीन कार्यकारिणी बांधणी करून पक्ष वाढीसाठी गाव तेथे शाखा काढून बहुजन, कष्टकरी आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांची निर्गत करण्याच्या हेतूने कोल्हापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आजऱ्यात सदिच्छा भेट दिली. कोल्हापूर लोकसभा परीक्षेत्र प्रमुख सागर कुरडे हे पक्षवाढीसाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्हा दौरा करीत आहेत. त्याअनुषंगाने आजरा तालुक्यास भेट दिली.


    

यावेळी बोलताना करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी म्हणाले की, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश उबाळे व उपाध्यक्ष दयानंद शिवजातक यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर लोकसभा व हातकणंगले लोकसभा या दोन्ही लोकसभेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात रिपब्लिकन सेना पक्ष वाढीसाठी गाव तिथे शाखा झाली पाहिजे असा निर्णय घेण्यात आला आहे. या चळवळीच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्य, शेतकरी, कामगार व बहुजन समाजाचे अनेक प्रश्न जाणून घेऊन ते मार्गी लावण्यासाठी रिपब्लिकन सेना आज आजरा तालुका येथे हरिभाऊ कांबळे (जय शिवराय किसान संघटना तालुका अध्यक्ष व आजरा कारखाना संचालक )यांची सदिच्छा भेट घेऊन पक्ष वाढीसाठी तसेच इतर विषयावर चर्चा केली आहे असे म्हणाले.



यावेळी हरिभाऊ कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत सकारात्मक कार्य करण्याचे आश्वासन दिले. डॉ.बाबासाहेबांचे विचार घेऊन जिथे अन्याय होईल तेथे हा निळा झेंडा पोहचेल याची खात्री देतो असे ते म्हणाले.



याप्रसंगी सागर कुरडे (जिल्हा महासचिव रिपब्लिकन सेना), प्रवीण आजगेकर (कोल्हापूर शहर अध्यक्ष), अर्जुन कांबळे (करवीर तालुका महासचिव ), विनोद कांबळे (जिल्हा कोषाध्यक्ष), सुरेश दिवेकर (आजरा)आदिजण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.