Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बड्याचीवाडी येथे उद्या मोफत वैद्यकीय शिबिर

ई. बी. गडकरी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या वतीने आयोजन 




गडहिंग्लज (प्रतिनिधी ):  ई. बी. गडकरी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, गडहिंग्लज यांच्या वतीने बड्याचीवाडी (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथे गुरुवार, २० ऑगस्ट रोजी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


हे शिबिर सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० या वेळेत बड्याचीवाडी गावात होणार आहे. शिबिरात विविध आजारांवर मोफत होमिओपॅथिक उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नोंदणीची गरज नसून सर्वांसाठी मोफत सेवा उपलब्ध असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.


शिबिरात सांध्यातील कंबरदुखी व हाडांचे आजार, मुतखडा व मूत्रविकार, श्वसनाचे आजार, पचनसंस्थेचे आजार, आहारविषयक समस्या तसेच महिलांचे विविध आजार यांसह इतर आरोग्य समस्यांवर तपासणी व उपचार केले जाणार आहेत.


सर्व वयोगटातील नागरिकांसाठी हे शिबिर उपयुक्त असून, नैसर्गिक व सुरक्षित होमिओपॅथिक उपचार पद्धतीद्वारे आरोग्यविषयक सेवा देण्याचा उपक्रम असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क : डॉ. जे. आर. फगरे –1) 90491 59262   2) विनायक पाटील  89759 91874

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.