Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी सतीश पाटील, उपाध्यक्ष जगदीश पट्टणशेट्टी



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांची तर उपाध्यक्षपदी जगदीश पट्टणशेट्टी यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ  खेळाडू महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ही वार्षिक निवड एकमताने करण्यात आली. 


युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत हंगामात होणा-या सर्व उपक्रमांचे वेळापत्रकाला बैठकीत मंजूरी देण्यात आली. एम. आर. हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या या बैठकिस युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे संचालक, खेळाडू उपस्थित होते. ललित शिंदे यांनी स्वागत केले. युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या विस्ताराची माहिती दिली. स्पर्धा विभाग समन्वयक ओमकार जाधव यांनी हंगामातील विविध स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले. अध्यक्षपदासाठी सतीश पाटील यांना सुरेश कोळकी सुचक तर मल्लीकार्जून बेल्लद यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदी जगदीश पट्टणशेट्टी यांना प्रा. सुनिल शिंत्रे यांनी सुचक तर शक्ती चौगुले अनुमोदक होते. माजी अध्यक्ष श्री कोळकी यांनी गेल्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा मांडला.



यावेळी सतीश पाटील म्हणाले, युनायटेडने गेले दोन दशकाहून अधिक काळ फुटबॉलच्या प्रसारासाठी योगदान दिले. मोबाईलमुळे सगळीकडे मुले मैदानापासून दुरावताना येथील मैदाने नवोदित फुटबॉलपटूंनी भरली आहेत. त्यामुळे आता खेळाडू आणि प्रशिक्षकांना अधिक सुविधासाठी नियोजन केले जाईल. यावेळी संचालक प्रशांत दड्डीकर, यासीन नदाफ, नितीन पाटील, सुभाष पाटील, संतोष निळकंठ, सौरभ जाधव, सागर पोवार यासह खेळाडू उपस्थित होते.


माजी खेळाडूसाठी स्पर्धा

युनायटेड मार्फत वर्षभर आठ वर्षापासून वरिष्ठ  गटापर्यंत सर्व खेळाडूंना संधी मिळावी म्हणून विविध स्पर्धा घेतल्या जातात. लोकवर्गणीतून अखिल भारतीय दिवाळीतील स्पर्धेचे यंदाचे एकविसावे वर्ष आहे. यंदा बेबी लीग, तेरा, पंधरा, सतरा, डेव्हलपमेंन्ट लीगसह उन्हाळी मोफत प्रशिक्षण शिबिर आदी उपक्रम कायम ठेवण्यात आले आहेत. यात यावर्षीपासून चाळीस वर्षावरील माजी खेळाडूसाठी स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.