डॉ. अग्रवालस्, अंकुर हॉस्पिटल आणि शिवशांती क्लिनिकचा संयुक्त उपक्रम
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तेरणी येथे मोफत नेत्रतपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. अग्रवालस् डोळ्यांचे हॉस्पिटल, अंकुर डोळ्यांचे हॉस्पिटल (गडहिंग्लज) आणि शिवशांती क्लिनिक (तेरणी) येथील डॉ. एम. एस. पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत शिवशांती क्लिनिक, तेरणी (ता. गडहिंग्लज) येथे पार पडणार आहे.
शिबिरात मिळणाऱ्या प्रमुख सुविधा:
मोतीबिंदू तपासणी: तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोतीबिंदूची अचूक तपासणी.
चष्म्याचा नंबर तपासणी: संगणकीय पद्धतीने डोळ्यांची तपासणी व नंबर निश्चिती.
सल्ला व मार्गदर्शन: डोळ्यांच्या विविध आजारांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
सवलतीच्या दरात चष्मे: शिबिरार्थींना अत्यल्प व माफक दरात चष्मे उपलब्ध करून दिले जातील.
कॅशलेस सुविधा: सर्व प्रकारच्या इन्शुरन्स (विमा) आणि कॅशलेस सुविधांचा लाभ उपलब्ध.
फ्री कूपन: उपस्थितांसाठी मोफत ओपीडी सल्ला (Free OPD Consultation) कूपन दिले जाणार आहे.
परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी, वृद्धांनी व विद्यार्थ्यांनी या मोफत नेत्रतपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. एम. एस. पाटील यांनी केले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क: ९५४५९२६४१५


