Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज येथे चोरट्यांनी तीन बंद घरे फोडली; ५० हजारांचा ऐवज लांबवला



गडहिंग्लज (प्रतिनिधी ): शहरातील विद्यानगर भागातील तीन बंद घरांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकुण ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वसीम इमामहुसेन दोट्याळ (वय ३९, व्यवसाय - मेडिकल दुकान, रा. विद्यानगर, गडहिंग्लज) हे दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास घर बंद करून गेले होते. या दरम्यान, पहाटे २.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील पहिल्या खोलीत असलेल्या लोखंडी तिजोरीचे लॉक तोडून आत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली. यामध्ये २५ हजार रुपये किंमतीची अर्धा तोळा वजनाची सोन्याची बोरमाळ, ५ हजार रुपये किंमतीचे चांदीचे कडे व पैंजण, १० हजार रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे.


दरम्यान, देवाकर तुकाराम पाटील यांचे घर फोडून ५ हजार रुपये किंमतीचे चांदीचे कडे व पैंजण तर प्रकाश शिवाप्पा चिगरे यांचे ५ हजार रुपये किंमतीचे चांदीचे गणपतीचे आभूषण, चांदीचे ताट, तांब्या तसेच गणपती व लक्ष्मीची चांदीची मूर्ती चोरट्यांनी लंपास केली आहे.


याप्रकरणी  गडहिंग्लज पोलीस ठाण्यात  अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची नोंद पो.हे.कॉ. मदने यांनी केली असून पो.हे.कॉ. पाटील  पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.