आजरा (हसन तकीलदार): गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आजरा तालुक्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत ठरावधारक, दूध उत्पादक आणि स्थानिक प्रमुख नेत्यांशी थेट संवाद साधला. शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सुरू झालेल्या या झंजावती दौऱ्यात तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये बैठकांचा धडाका सत्रात पार पडला. आगामी काळातही गोकुळचा कारभार दूध उत्पादकांच्या हिताचाच राहील, असा ठाम विश्वास यावेळी आमदार बंटी पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी बहिरेवाडी, मुमेवाडी, उत्तूर, आर्दाळ, मडिलगे, देवकांडगाव, कोरीवडे, पेरणोली, किणे व कोळिंद्रे या गावांमध्ये ठरावधारकांशी थेट संपर्क साधून विचारमंथन करण्यात आले.
आजरा अर्बन व जनता बँक सभागृहातील बैठकीत गोकुळच्या मागील पाच वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यात आला. मुकुंददादा देसाई यांनी ५ वर्षांतील प्रगतीचा आढावा सादर केला.
दूध उत्पादक हित केंद्रस्थानी
मागील पाच वर्षांत दिलेली विक्रमी दरवाढ आणि अमलात आणलेला सोलर प्रकल्प यांसारख्या विविध कल्याणकारी कामांचा आमदार बंटी पाटील यांनी विशेष उल्लेख केला.या दौऱ्यात आणि बैठकांमध्ये तालुक्यातील दिग्गज नेते व ठरावधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अंजनाताई रेडेकर, अभिजीत तायशेटे, रणजितसिंह पाटील, विद्याधर गुरबे, राहुल देसाई, शामराव देसाई, सत्यजित जाधव, सचिन घोरपडे, ज्ञानेश शशिकांत पाटील चुयेकर, सुनिल शिंत्रे, मुकुंददादा देसाई, सुधीर भाऊ देसाई, महादेव हेब्बाळकर, एम. के. देसाई, अल्बर्ट डिसोझा, जनार्दन बामणे, राजू मुरकुटे, विजय पाटील, सिद्धेश नाईक, अनिकेत चराटी, गोविंद गुरव, प्रकाश कविटकर, दशरथ अमृते, संजय शेणगावे, जम्बोअण्णा गोरुले, सचिन परीट, विजय गुरव, बबनराव पाटील, विश्वनाथ करंबळी, सचिन उत्तूरकर, विजय सावेकर, बाळासाहेब पाटील, मारुती घोरपडे, स्वागत परुळेकर, अनिल जांभळे, संग्रामराजे घोडके, अजित उत्तूरकर, शौनकराज देसाई, संभाजी तांबेकर, अमोल बांबरे, सचिन पावले, तानाजी गुरव, जयवंत सुतार, एम. एस. पाटील, रमेश बुगडे, दिपाली पाटील, गोविंद नारळकर उपस्थित होते.
'टीम सतेज'च्या वतीने रवींद्र भाटले, प्रकाश पाटील, संदिप गुरव, मंगेश गुरव, दत्तात्रय यादव, प्रकाश मोरे, संजय कांदळकर, राजू चौगुले व प्रकाश माळी यांनी संपूर्ण दौऱ्याचे उत्कृष्ट नियोजन केले.
किरण पाटील, विनायक पाटील, सुधीर पाटील, विजय पोवार, सुमीत सावंत, बाळासाहेब पाटील, विक्रम देसाई व नौशादभाई बुडेखान यांनी दौरा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
बैठकीच्या शेवटी राजू होलम यांनी उपस्थितांचे आभार मानले. गोकुळचे हित आणि दूध उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आजरा तालुक्यातील ठरावधारक भक्कमपणे आमदार बंटी पाटील यांच्या नेतृत्वाच्या पाठीशी राहतील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


