Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बसर्गेचे कौस्तुभ नाडगोंडे 'महाराष्ट्र ऑफ रोड' स्पर्धेत चमकले; पुण्याच्या तुषार संगमनेरकरसोबत पटकावले तिहेरी मुकुट!



रायगड : साहसी ड्रायव्हिंग आणि थराराचा अनुभव देणाऱ्या 'महाराष्ट्र ऑफ रोड ४x४ ॲडव्हेंचर' स्पर्धेत बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील सुपुत्र कौस्तुभ नाडगोंडे आणि पुण्याचे तुषार संगमनेरकर या जोडीने नेत्रदीपक कामगिरी करत तिहेरी मुकुट पटकावला. विला बगड एम.आय.डी.सी. (रायगड) येथे 'महाराष्ट्र मोटार स्पोर्ट्स ग्रुप'च्या वतीने २१ ते २४ ऑगस्ट दरम्यान या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून तब्बल ६० वाहने आणि १२० सराईत स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत खडतर मार्ग, चिखल आणि टेकड्यांच्या आव्हानात्मक मोर्चामध्ये चालकांच्या कौशल्याची आणि वाहनांच्या क्षमतेची मोठी परीक्षा पाहायला मिळाली. ही स्पर्धा एकूण ९ वेगवेगळ्या गटांमध्ये पार पडली. यामध्ये महिला, एस.यू.व्ही. (स्टॉक व मॉडिफाईड), पेट्रोल व डिझेल (एक्सपर्ट व मॉडिफाईड) आणि एक्सट्रीम अशा विविध प्रकारांचा समावेश होता.


या स्पर्धेतील 'एस.यू.व्ही. स्टॉक' (SUV Stock) आणि 'एस.यू.व्ही. मॉडिफाईड' (SUV Modified) या दोन्ही मुख्य आणि आव्हानात्मक श्रेणींमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कौस्तुभ नाडगोंडे आणि पुण्याच्या तुषार संगमनेरकर या जोडीने वर्चस्व गाजवले. उत्कृष्ट ताळमेळ आणि वेगवान कौशल्याच्या जोरावर या जोडीने तब्बल ३ विजेतेपदे आणि १ उपविजेतेपद मिळवून स्पर्धेवर आपले नाव कोरले.


कौस्तुभ नाडगोंडे यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे बसर्गेसह संपूर्ण गडहिंग्लज तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातून, विशेषतः मोटार स्पोर्ट्स जगतातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.