Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार शिवाजीराव पाटील यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद; विकास आणि जनसेवेची त्रिसूत्री अमलात आणण्याचा निर्धार!

चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजप संघटना बळकटीकरणावर भर


आमदारांचे कार्यकर्त्यांना जनसेवेचे आवाहन




गडहिंग्लज (संतोष नाईक ): राजकारण हे केवळ पदापुरते मर्यादित नसून जनसेवा हेच आमचे मुख्य ध्येय आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास, सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची सोडवणूक आणि मजबूत पक्ष संघटना या त्रिसूत्रीवर आगामी काळात अधिक जोमाने काम केले जाईल, असा ठाम निर्धार चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला.


ईनाम सावर्डे (ता. चंदगड) येथील भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित 'जनता दरबार' आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. 



समस्या सोडविण्याच्या अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

जनता दरबाराच्या माध्यमातून चंदगड विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतून आलेल्या शेकडो नागरिकांनी आमदार पाटील यांची भेट घेऊन आपल्या वैयक्तिक व गावपातळीवरील प्रलंबित समस्या मांडल्या. नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतल्यानंतर आमदार पाटील यांनी काही गंभीर समस्यांबाबत संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

 

पाठपुरावा करण्याची ग्वाही


शासन व प्रशासन स्तरावर प्रलंबित असलेल्या इतर प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून ते लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी या वेळी उपस्थित नागरिकांना दिली. 



बुथ हा संघटनेचा पाया, कार्यकर्ता ही खरी ताकद! 


प्रत्येक पदाधिकारी व बुथ प्रमुखाने जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे. त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी तत्परतेने पुढाकार घ्यावा. जनतेचा विश्वास हीच आपली ताकद, कार्यकर्त्यांची साथ हीच आपली ऊर्जा आणि चंदगडचा सर्वांगीण विकास हेच आपले अंतिम ध्येय आहे.

 आमदार शिवाजीराव पाटील



संघटन मजबुतीसाठी रणनीतीवर मंथन


जनता दरबारानंतर चंदगड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत, विशेषतः ग्रामीण भागातील घटकांपर्यंत पोहोचविण्याबाबत दिशा ठरवण्यात आली.  प्रत्येक बुथ अधिक मजबूत आणि सक्रिय करून गावागावातील जनतेच्या दैनंदिन प्रश्नांसाठी कार्यकर्त्यांनी आघाडीवर राहून काम करण्याबाबत रणनीती आखण्यात आली.



या कार्यक्रमाला तालुक्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे संचालक, बुथ प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.