Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुग्ध व्यवसायाचा ३२ वर्षांचा यशस्वी अध्याय! ; तेरणीत बसवेश्वर दुध संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

गावातील कर्तुत्ववानांचा येथोचित सत्कार




गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील नामांकित श्री बसवेश्वर सहकारी दूध उत्पादक संस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. संस्थेचे संस्थापक अरुण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेअरमन संजय जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. 


३२ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतानाच, या सभेचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उत्तुंग यश मिळवणाऱ्या परिसरातील कर्तृत्ववान सुपुत्रांचा आणि गुणवंतांचा संस्था आणि ग्रामस्थांच्या वतीने विशेष नागरी सत्कार करण्यात आला.



स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा बहुमान


सहाय्यक गट विकास अधिकारी पदी निवड झालेले नलकुमार हालबागोळ, तसेच मंत्रालय सहाय्यक पदावर निवड झालेले सोहेल अंकली, केंद्रप्रमुख पदी पदोन्नती व नियुक्ती झालेले मल्लिकार्जुन यादगुडी, करवीर गोरे, अजित हिरेमठ आणि सौ. ज्योती नंद्यापगोळ,  मुख्याध्यापिका पदी निवड झाल्याबद्दल सौ. शालन हालबागोळ. डॉक्टरेट (Ph.D.) ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी संपादन केल्याबद्दल मोसीन मुल्ला यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्तींचे अभिनंदन करताना, या गुणवंतांच्या यशातून आणि जिद्दीतून परिसरातील तरुण पिढीने प्रेरणा घेऊन उज्ज्वल भविष्य घडवावे, असे प्रतिपादन केले.



सर्वांनी अशीच एकजूट कायम ठेवावी : चेअरमन संजय जोशी 

सभेच्या सुरुवातीला संस्थेचे चेअरमन संजय जोशी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे शब्दसुमनानी स्वागत केले. संस्थेच्या ३२ वर्षांच्या यशस्वी आणि पारदर्शक प्रवासात संस्थापक, संचालक मंडळ, दूध उत्पादक सभासद व कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेच्या आणखी भावी प्रगतीसाठी सर्वांनी अशीच एकजूट कायम ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



सभासदांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव करवीर नावलगी यांनी मानले. या वार्षिक सभेला दूध उत्पादक सभासद, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.