Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या कडगाव येथील वृद्धाचा मृत्यू



गडहिंग्लज (प्रतिनिधी): अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या ६३ वर्षीय वृद्धाला उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ही घटना कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे घडली. महादेव बाळू चौगुले (वय ६३, रा. कडगाव) असे मृत वृद्धाचे नाव आहे.


याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, महादेव चौगुले हे शुक्रवारी सकाळी अचानक चक्कर येऊन खाली पडले व बेशुद्ध झाले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने सकाळी ११ वाजताच्या सुमारास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.


या घटनेची माहिती मयताचे भाऊ सदाशिव बाळू चौगले (वय ६०, व्यवसाय-सेवानिवृत्त शिक्षक, रा. कडगाव) यांनी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात दिली. पोलीस ठाण्यात मयताची नोंद महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुतार यांनी घेतली असून  या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस नाईक गिरी करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.