Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज येथे विहिरीत बुडून वृद्धाचा मृत्यू ; मार्केट यार्ड परिसरातील घटना



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हातपाय धुण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी विहिरीच्या काठावर गेलेल्या एका ७८ वर्षीय वृद्धाचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गडहिंग्लज येथील मार्केट यार्ड परिसरात घडली आहे. दस्तगीर बाळासाहेब तुरेवाले (वय ७८, रा. माळगी गल्ली, भैरी रोड, गडहिंग्लज) असे मृत वृद्धाचे नाव आहे.


पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दस्तगीर तुरेवाले हे दि. १४ सप्टेंबर  रोजी सायंकाळी ७.०० ते दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मार्केट यार्डातील बाजार समिती कार्यालयाजवळ असलेल्या विहिरीवर गेले होते. तेथे काठावर उभे असताना अचानक तोल गेल्याने अथवा पाय घसरल्याने ते विहिरीच्या खोल पाण्यात पडले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला.


या प्रकरणी मुलगा राजु दस्तगीर तुरेवाले (वय ४३, व्यवसाय - कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, रा. माळगी गल्ली, भैरी रोड, गडहिंग्लज) यांनी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी  अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


सदर घटनेची नोंद महिला पोलीस हवालदार सुतार यांनी केली असून, पोलीस अंमलदार पोलीस हवालदार पाटील या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.