Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी गडहिंग्लज शहरातील वाहतुक मार्गात बदल

२५ व २६ सप्टेंबरला दोन दिवस वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली


उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांचे आदेश




गडहिंग्लज (प्रतिनिधी): सार्वजनिक गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक येत्या २५ आणि २६ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात पार पडणार आहे. शहरातील ३८ सार्वजनिक गणेश तरुण मंडळांच्या या भव्य मिरवणुका पाहण्यासाठी भाविकांची होणारी प्रचंड गर्दी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासन सज्ज झाले आहे. मिरवणूक काळात शहरात कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये आणि उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी उपविभागीय अधिकारी  एकनाथ काळबांडे यांनी 'महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४' अन्वये २ दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत महत्त्वाचे बदल लागू केले आहेत.

हा बदल शुक्रवार, २५ सप्टेंबर  रोजी दुपारी ३.०० वाजल्यापासून ते शनिवार, २६ सप्टेंबर  रोजी सकाळी २.०० वाजेपर्यंत लागू असणार आहे.



मिरवणूक मार्ग असा असेल


शहरातील विसर्जन मिरवणूक दसरा चौक ➔ अहिल्यादेवी होळकर चौक ➔ मुसळे तिकटी ➔ वीरशैव चौक ➔ नेहरू चौक अशी काढली जाणार आहे. या मुख्य मार्गावर नागरिकांची मोठी गर्दी होणार असल्याने या भागातील नेहमीची वाहतूक इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे.



असे असतील पर्यायी वाहतूक मार्ग:


१.संकेश्वरकडून गडहिंग्लजमार्गे आजरा व चंदगडकडे येणारी वाहने महेंद्रा शोरूम ➔ गांडूळ प्लॅन्ट ➔ मेठाचा मार्ग ➔ सोलापूरे वसाहत a➔ आय.टी.आय. कॉलेज शेंद्री रोड ➔ काळभैरव कमान ➔ मारुती मंदिर ढोरवसाहत ➔ बी.एस.एन.एल. कार्यालय ➔ एम.आर. चौक ➔ भगवा चौक➔ चर्च रोड ➔ शानबाग हॉस्पिटल ➔ते गडहिंग्लज डेपो➔ भडगाव रोड ➔ चंदगड- आजरा रोड अशी वळवण्यात आली आहे.


२.गडहिंग्लज, आजरा व चंदगडकडून संकेश्वरकडे जाणारी वाहने चर्च रोड ➔ भगवा चौक ➔ एम. आर. हायस्कूल चौक ➔ बी.एस.एन.एल. कार्यालय ➔ हनुमान मंदिर ➔ काळभैरी रोड ➔ शेंद्री रोड ➔ वारणा दूध संघासमोरून औरनाळ गावातून ➔ औरनाळ फाटा ते संकेश्वर रोडकडे वळवण्यात आली आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.