Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सण साजरा करा पण प्रदूषण नको-सरपंच परिषद मुंबईचे आवाहन

फटाकेमुक्त सण साजरा करा




आजरा(हसन तकीलदार) : भारतीय समाज हा सण, संस्कृती आणि उत्सवप्रिय आहे. आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सण हा आनंद, ऐक्य, परंपरा आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. परंतु आधुनिक काळात हे सण, उत्सव, सोहळे किंवा अन्य कार्यक्रम साजरे करताना काही नव्या प्रथा समाविष्ट झाल्या असून त्याचा निसर्गावर आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. त्यातीलच एक भाग म्हणजे फटाक्यांचा अतिरेक वापर.

      

फटाक्यामुळे वायुचे भयानक प्रदूषण होते. फटाक्यामध्ये पोटॅशियमनायट्रेट, सल्फर, कोळसाची भुकटी, बॅरियम, मॅग्नेशियम, लीड, अर्सेनिक ऍल्यूमिनियम, स्ट्रॉंशियम यासारख्या अनेक  रासायनिक घटकांचा वापर केला जातो. हे पदार्थ जळताना हवेमध्ये नायट्रोजन ऑक्साईड, सल्फरडाय ऑक्साईड, कार्बनडाय ऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड तसेच धूर व सूक्ष्म धुलिकण सोडतात. त्यामुळे वातावरणातील हवा प्रदूषित होते परिणामी श्वसनाचे आजार, दमा, ब्रॉन्कायटीस, फुफुसाचे संक्रमण आणि ह्रदय विकारांचा धोका वाढू शकतो. त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण, जलस्रोत्रांचेप्रदूषण, जमिनीचे प्रदूषण होते.

     

त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकांनी प्रदूषणमुक्त आणि पर्यावरण पूरक फटाक्याशिवाय सणांचा व इतर कार्यक्रमांचा आनंद घ्यावा. पारंपारिक दिवे, एल.इ.डी.लाईट्स, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि पर्यावरण संवर्धनाचे संकल्प करून अधिक आनंददायी सण साजरे करण्याचे आवाहन सरपंच परिषद मुंबईच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष इंजिनियर जी. एम. पाटील यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.