Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चंदगड तालुक्यातील ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी करा!

ठाकरे शिवसेनेचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन




गडहिंग्लज (प्रतिनिधी):  चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे पोल्ट्री फार्मच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर ड्रग्ज निर्मिती कारखाना प्रकरणाची सखोल चौकशी करून यामागील मुख्य सूत्रधार आणि गुंतवणूकदारांवर कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन ठाकरे शिवसेनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांना देण्यात आले. सदर निवेदन शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा.सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.


या निवेदनात म्हटले आहे की, पुणे अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे छापा टाकून १०० कोटी रुपयांचे रसायने व साहित्य जप्त केले असून, काजू उद्योजकासह आठ जणांना अटक केली आहे. या कारवाईत बंदी घातलेली खताची पावडर व इतर घातक रसायने जप्त करण्यात आली आहेत. स्थानिक नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी गुटखा कारखान्याचा बनाव रचून हा ड्रग्ज निर्मितीचा धक्कादायक प्रकार सुरू होता.


यापूर्वी ढोलगरवाडी आणि म्हाळेवाडी येथेही वरिष्ठ यंत्रणांनीच ड्रग्जविरोधात कारवाया केल्या होत्या. सलग तिन्ही कारवाया बाहेरील यंत्रणांनाच कराव्या लागल्याने स्थानिक यंत्रणेच्या  कार्यपद्धतीवर आणि भूमिकेवर गंभीर संशय निर्माण होत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या त्रिराज्य सीमेचा फायदा घेऊन ड्रग्ज माफिया या परिसराला केंद्र बनवत आहेत.


ड्रग्ज कारखान्यामागील मुख्य 'गॉडफादर' आणि सर्व गुंतवणूकदारांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करावी, स्थानिक पोलीस व संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणाची किंवा संशयित सहभागाची सखोल चौकशी व्हावी, सीमावर्ती भाग ड्रग्जमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कडक पावले उचलावीत आदी मागण्या या निवेदनातून केल्या आहेत. प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल न घेतल्यास 'शिवसेना स्टाईल'ने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर, गडहिंग्लज तालुकाप्रमुख अजित खोत, आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार, युवा सेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, सहकार सेना जिल्हा संघटक श्रीशैलाप्पा साखरे, सरकार सेना जिल्हा संघटक दिनेश कुंभीरकर, शहर प्रमुख प्रकाश रावळ, उपतालुकाप्रमुख सुधाकर जगताप, उपतालुका प्रमुख वसंत नाईक, उपतालुका प्रमुख सुरेश हेब्बाळे, उपतालुका प्रमुख संजय पाटील, विभाग प्रमुख दिगंबर पाटील, उपशहर प्रमुख मारुती कदम, उपशहर प्रमुख शैलेश इंगवले, उपशहर प्रमुख बाळू कुंभार, उपशहर प्रमुख कृष्णा कांबळे यांच्यासह शिवसैनिक संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.