Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला शनिवारपासून पंधरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धा

स्थानिकसह कोल्हापूर, बेळगावच्या शाळा होणार सहभागी




गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे शनिवारपासून (ता. २६) पंधरा वर्षाखालील आंतरराज्य शालेय फुटबॉल स्पर्धा होणार आहे. युनायटेडचे माजी अध्यक्ष सुनिल चौगुले यांच्या स्मृती पित्यर्थ या स्पर्धा होत आहेत. एम. आर. हायस्कुल मैदानावर नाईन साईट पध्दतीने ही स्पर्धा होईल. स्थानिकसह कोल्हापूर, बेळगावच्या नामाकिंत शालेय संघांना निंमत्रित केले आहे. स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.


स्थानिक शालेय संघांना परगावच्या संघाशी खेळण्याची संधी मिळावी म्हणून ही स्पर्धा होत आहे. त्यातून खेळाडूंना आपली क्षमता सुधारण्यासाठी प्रोत्साहन मिळावे असा प्रयत्न आहे. गडहिंग्लज युनायटेडचे माजी अध्यक्ष (कै.) सुनिल चौगुले यांच्या स्मृती पित्यर्थ गेल्या दोन वर्षापुर्वी या १५ वर्षाखालील स्पर्धेची सुरवात झाली. पहिल्या दिवशी स्थानिक संघात बाद पध्दतीने सामने होतील. यातील विजेते संघ दुस-या दिवशी कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातील नामाकिंत शालेय संघाशी लढतील. रविवारी दुपारी उपांत्य फेरीचे तर सायंकाळी अंतिम सामना होईल.


सन २०११ आणि २०१२ जन्मतारिख असणारे विद्यार्थी खेळू शकतील. स्पर्धा नाईन साईट असून संघात चौदा खेळाडू असतील. खेळाडूंची क्षमता लक्षात घेऊन मैदानाचा आकार लहान करण्यात आला आहे. विजेत्या, उपविजेत्या संघासह उत्कष्ठ गोलरक्षक, बचावपटू, मध्यरक्षक, आघाडीपटू आणि स्पर्धावीर यांना बक्षिसे आहेत. तरी संघानी सहभागी व्हावे असे आवाहन गडहिंग्लज युनायटेडचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष जगदिश पट्टणशेट्टी यांनी केले आहे. स्पर्धा समन्वयक दत्ता चव्हाण आणि सहकारी स्पर्धेचे नियोजन करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.