Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

धकाधकीच्या आयुष्यात आनंदाची पर्वणी; कळविकट्टेत 'होम मिनिस्टर' स्पर्धेने जिंकली महिलांची मने!

सौ. निशा मुळीक ठरल्या प्रथम क्रमांकाच्या 'होम मिनिस्टर'


क्रांतिवीर गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम




गडहिंग्लज (संतोष नाईक): वर्षभराच्या धकाधकीच्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या दिनक्रमातून महिलांना आनंदाचे काही क्षण मिळावेत, त्यांना मोकळेपणाने व्यक्त होता यावे आणि कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने कळविकट्टेत येथील क्रांतिवीर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने खास 'होम मिनिस्टर' या रंगतदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गावातील महिलांनी उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद दिला.


कार्यक्रमा दरम्यान विविध पारंपरिक व मजेशीर खेळ, उखाणे आणि विविध स्पर्धांमुळे वातावरणात प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. महिलांनी पूर्ण मोकळेपणाने खेळत आणि हसत-खेळत या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. तीव्र चुरशीच्या आणि तितक्याच मनोरंजक ठरलेल्या या स्पर्धेत महिलांनी आपल्या चुणचुकीने उपस्थितांची मने जिंकली.



स्पर्धेतील विजेत्या महिला:


प्रथम क्रमांक (पैठणी व मानाची भेटवस्तू): सौ. निशा पंकज मुळीक (बक्षीस दाते: श्री. खरात - मुख्याध्यापक, सी. एस. मुंगुरवाडे हायस्कूल, कळविकट्टे)


द्वितीय क्रमांक (पैठणी व भेटवस्तू): सौ. नूतन विनोद मगदूम (बक्षीस दाते: श्री. लक्ष्मण तानाजी निकम)


तृतीय क्रमांक (पैठणी व भेटवस्तू): सौ. दिपाली शरद पाटील (बक्षीस दाते: श्री. तानाजी शांताराम नौकुडकर)


उत्तेजनार्थ / चतुर्थ क्रमांक (आकर्षक पर्स): सौ. सरिता अनिल देसाई (बक्षीस दाते: श्री. लक्ष्मण तानाजी निकम)



स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे आणि सहभागी महिलांचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. महिलांना एकत्र आणून असा मनोरंजक व स्नेहाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल क्रांतिवीर गणेशोत्सव मंडळाच्या या उपक्रमाचे कळविकट्टे गावासह परिसरातून विशेष कौतुक होत आहे. राजाराम संभाजी निकम यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन करत भावोजीची भूमिका उत्तमरीत्या पार पाडली.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.