Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जागृती प्रशालेत वाचन प्रेरणा दिन व ग्रंथ प्रदर्शन उत्साहात



गडहिंग्लज (संपत सावंत): वाचन हे केवळ ज्ञान मिळविण्याचे साधन नसून विचारांना दिशा देणारे, स्वप्नांना बळ देणारे आणि व्यक्तिमत्वाला आकार देणारे अतिशय प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन वनस्पती तज्ञ डॉ.एस.के. नेर्ली यांनी भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जागृती प्रशालेत वाचन प्रेरणा दिन व ग्रंथ प्रदर्शन प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक उमेश सावंत होते.



स्वागत कु. वैदही बामणे हिने केले.कु. ऐश्वर्या पवार हिने प्रास्ताविक तर कु. आर्या पाटील हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. एपीजे अब्दुल कलामांच्या प्रतिमापूजना नंतर त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर कल्पित पाटील, रामा सोमशेट्टी, भार्गव गवळी, कु. अक्षरा चव्हाण, कु.आरती पाटील, कु.मृणाली चौगुले, कु. अक्षरा पाटील यांची भाषणे झाली. दरम्यान कु.श्रुतीका पाटील,कु.अक्षरा चव्हाण व रामा सोमशेट्टी यांनी सादर केलेल्या नाटीकेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.



ग्रंथ प्रदर्शनात कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे, ऐतिहासिक ग्रंथ, बाल साहित्य, विज्ञान व गणित विषयक विविध पुस्तकांची माहिती कु. शरण्या परमशेट्टी, कु. समीक्षा हेबुले, कु. कीर्ती पाटील, कु. कस्तुरी चाळक, कु. ज्ञानेश्वरी पवार, कु. अमृता माळवी, कु. सायली काटे, कु. प्रतीक्षा मरगुद्री, कु. सिद्धी कांबळे, स्वरूप लोहार यांनी आत्मविश्वासाने दिली. पुस्तकांची पाहणी करताना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.



डॉ. कलाम यांच्या जीवन कार्याचा आदर्श आणि नियमित वाचनाची सवय जोपासावी असे मुख्याध्यापक उमेश सावंत यांनी सांगितले. यावेळी उपमुख्याध्यापक अनिल मसाळे, पर्यवेक्षक महंतेश दड्डी,उपप्राचार्या प्रा. विद्या पन्हाळे, प्रा .गुरुलिंग खंदारे, ग्रंथपाल सुशांत घाळी उपस्थित होते.


मराठी विभाग प्रमुख रवींद्र भंडारे, प्रवीण सावंत, अनिल कांबळे तसेच कु.स्नेहल गोते, कु. श्वेता इरली यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तनिष्का चिकुर्डे, कु.समीक्षा देसाई यांनी तर आभार अन्वी मगदूम हिने मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.