गडहिंग्लज (संपत सावंत): नवरात्र उत्सवाच्या मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्या प्रसारक मंडळ, गडहिंग्लज संचलित जागृती हायस्कूलमध्ये पारंपरिक वेशभूषा व रास दांडिया स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या. पारंपरिक संस्कृतीचा जागर, संगीताचा ताल आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शालेय परिसर उत्साहाने भारावून गेला होता.
दोन गटात झालेल्या पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध राज्यांचे पोशाख परिधान केले होते. भारतीय संस्कृतीचे वैविध्य आणि परंपरेचे सौंदर्य त्यांच्या वेशभूषेतून प्रतिबिंबित दिसत होते. कु. समृद्धी सागर, कु. समीक्षा पाटील, प्रज्ञेश पाटील, रुद्र हसुरे यांना पारंपरिक वेशभूषेत तर रास दांडिया स्पर्धेत इयत्ता सातवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी तालबद्ध नृत्य, आकर्षक हालचाली आणि सुरेख समन्वयातून आपल्या कलागुणांचे दर्शन घडवित प्रथम क्रमांक मिळविला.
स्पर्धेतील विजेत्यांना शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र उपमुख्याध्यापक अनिल मसाळे, पर्यवेक्षक महंतेश दड्डी,संपत सावंत यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रा.तृप्ती हंजी व प्रा.अश्विनी पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी तर सौ. गीता पाटील यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सौ.कल्पना पाटील, सौ. स्मिता शिंदे, दत्ता लोहार, प्रवीण सावंत, प्रवीण पाटील, सदानंद फुटाणे, सागर मगदूम, प्रकाश गायकवाड, दशरथ वरोटे, रवींद्र भंडारे, विपुल गावित, सौ. श्वेता पुंडपळ,सौ.गिता मगदूम यांनी विशेष परिश्रम घेतले.


