Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'गोकुळ' मतमोजणी : महायुतीचे तीन दिग्गज माजी अध्यक्ष पिछाडीवर



कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूरच्या राजकारणात आणि सहकाराच्या पटलावर अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘गोकुळ’ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) दूध संघ निवडणुकीच्या मतमोजणीत जसजशा मतमोजणीच्या फेऱ्या पुढे सरकत जातील तसतसा वेगवेगळा कल्प पुढे येत आहे. आता प्राप्त माहितीनुसार महायुतीचे तीन माजी अध्यक्ष आणि बडे नेते पिछाडीवर आहेत.


महायुतीचे वजनदार नेते आणि माजी अध्यक्ष अरुण डोंगळे व विश्वास पाटील हे सर्वसाधारण गटातून तर दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ  हे इतर मागासवर्गीय (ओबीसी) गटातून पिछाडीवर आहेत.


सहकार क्षेत्रातील मुरब्बी नेते मानले जाणारे अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील पिछाडीवर पडल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नवीद मुश्रीफ हे मागासवर्गीय गटातून पिछाडीवर असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या जागेवरील अंतिम निकालाकडे लागले आहे.


या निकालामुळे गोकुळच्या आगामी सत्तेची गणिते कोणत्या दिशेने जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे डोळे लागून राहिले आहेत. मतमोजणीची ही प्रक्रिया अत्यंत चुरशीची ठरत असून पुढील फेऱ्यांमध्ये काय बदल होतात, याकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.