Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सर्वात मोठी अपडेट : महाविकास आघाडीची घोडदौड सुरू, १४ उमेदवार आघाडीवर



कोल्हापूर : कोल्हापूरच्या बहुचर्चित आणि सहकार क्षेत्रातील अतिशय महत्त्वाच्या अशा 'गोकुळ' दूध संघ निवडणुकीच्या मतमोजणीत सध्या अत्यंत रंगतदार व उत्कंठावर्धक घडामोडी समोर येत आहेत. मतमोजणीच्या  कलांवरून आणि अपडेट्सनुसार, कोल्हापूरच्या राजकारणात मोठे वळण मिळाल्याचे दिसत आहेत. 


सध्या हाती आलेल्या ताज्या अपडेटनुसार, गोकुळच्या मतमोजणीत महाविकास आघाडीने जोरदार आगेकूच केली असून महाविकास आघाडीचे १४ उमेदवार सध्या आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. या लक्षणीय आघाडीमुळे महाविकास आघाडीच्या गोटात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून कार्यकर्त्यांनी विजयाच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे.


सध्या मतमोजणीची प्रक्रिया वेगात सुरू असून जसजसे नवीन फेऱ्यांचे निकाल हाती येत आहेत तसतशी उत्सुकता अधिकच वाढली आहे. या निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.