Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'जागृती'च्या शर्व घुगरेची राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेसाठी निवड ; १०मीटर पीप साईट एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक



गडहिंग्लज (संपत सावंत):  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, कोल्हापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने शूटिंग रेंज, विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे पार पडलेल्या शालेय शासकीय विभागीयस्तर शूटिंग स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांच्या गटात विद्या प्रसारक मंडळ, गडहिंग्लज संचलित जागृती हायस्कूल, गडहिंग्लजचा नेमबाजपटू शर्व महेश घुगरे यांने १० मीटर पीप साईट रायफल प्रकारात सुवर्णपदक मिळविले. त्याची नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.


या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी, उपाध्यक्ष अरविंद कित्तुरकर, सचिव ॲड. बी. जी. भोसकी, सहसचिव गजेंद्र बंदी व सर्व संचालकांनी अभिनंदन केले. मुख्याध्यापक उमेश सावंत,उपमुख्याध्यापक अनिल मसाळे, पर्यवेक्षक महंतेश दड्डी यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक संपत सावंत, सचिन मगदूम, प्रकाश हरकारे व महेश घुगरे यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल शर्वचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.