Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांना 'महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार' प्रदान

महात्मा गांधी विचार मंच व सारथी चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : समाजोपयोगी कार्य आणि गांधीवादी मूल्यांचा वारसा जपणाऱ्या डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांना यंदाचा अत्यंत प्रतिष्ठेचा 'महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. महात्मा गांधी विचार मंच आणि सारथी चॅरिटेबल ट्रस्ट, गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष सोहळ्यात प्रसिद्ध लेखक व गांधीवादी विचारवंत चंद्रकांत झटाले यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.



विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात डॉ. कागणीकर यांच्या सामाजिक व वैचारिक योगदानाचा गौरव करण्यात आला.


पुरस्कार वितरणानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे चंद्रकांत झटाले म्हणाले की, महात्मा गांधी यांचे विचार केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसून ते आचरणात आणणे ही काळाची गरज आहे. डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांनी आपल्या कार्यातून हाच वस्तुपाठ घालून दिला असून, असा सन्मान त्यांच्या अखंड समाजसेवेची पोचपावती आहे.



कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. सुनील शिंत्रे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी महात्मा गांधी विचार मंच आणि सारथी चॅरिटेबल ट्रस्टच्या उपक्रमांचा आढावा घेतला. त्यानंतर प्राचार्य पी. डी. पाटील यांनी प्रमुख पाहुणे व पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला. प्रा. सुभाष कोरी यांनी मानपत्राचे वाचन केले.



या सोहळ्यास प्राचार्य कल्याणराव पुजारी, प्राचार्य पी. डी. पाटील, प्रा. सुभाष कोरी, प्रा. टी. पी. पाटील, सुरेश पवार, साताप्पा कांबळे, जे. बी. बारदेस्कर, अरविंद बारदेस्कर, सुरेश दास यांच्यासह महात्मा गांधी विचार मंचाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.