Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राजगोळी खुर्द येथे ओलम ग्लोबलच्या ३०० KLPD आसवनी प्रकल्पाचे दिमाखदार उदघाटन

६०० किलोलीटर क्षमतेसह रोजगार निर्मितीला आणि शेतकरी प्रगतीला मोठा हातभार


'उन्नती' उपक्रमांतर्गत प्रगतशील शेतकऱ्यांचा 'ओलम गौरव शिल्ड' देऊन गौरव





गडहिंग्लज (प्रतिनिधी): ओलम ग्लोबल ऍग्री कमोडिटीज इंडिया प्रा. लि., राजगोळी खुर्द (चनेहट्टी-राजगोळी, ता. चंदगड) येथील नव्याने उभारण्यात आलेल्या ३०० KLPD क्षमतेच्या अत्याधुनिक आसवनी (डिस्टिलरी) प्रकल्पाचा अधिकृत उदघाटन समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. ओलम ग्रुपचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मुथू कुमार एन. यांच्या शुभहस्ते कोनशिला अनावरण करून या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. हा कार्यक्रम बिझनेस हेड  टी. कन्नन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.


या प्रकल्पामुळे चंदगड आणि परिसरातील कृषी विकासाला गती मिळण्यासोबतच स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.


शेतकरी हाच या प्रकल्पाचा खरा केंद्रबिंदू: मुथू कुमार एन.


उद्घाटनानंतर आपले मनोगत व्यक्त करताना ओलम ग्रुपचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मुथू कुमार एन. म्हणाले, हा आसवनी प्रकल्प केवळ एक उद्योग नसून परिसरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचे केंद्र ठरणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असून, याचा थेट आणि अप्रत्यक्ष लाभ परिसरातील सर्व घटकांना व नागरिकांना होईल.


कंट्री हेड संजय सचेती यांनी कंपनीच्या 'उन्नती ऊस विकास कार्यक्रमा'ची माहिती दिली. ते म्हणाले, ओलम कंपनीने UPL सह अन्य नामांकित कंपन्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवावे.


तसेच, बिझनेस हेड व कार्यक्रमाचे अध्यक्ष टी. कन्नन यांनी परिसरातील सर्व शेतकरी बंधूंना आवाहन केले की, आपण पिकवलेला संपूर्ण ऊस व मका ओलम कंपनीला देऊन हा प्रकल्प अधिक प्रगतीपथावर नेण्यासाठी सहकार्य करावे.


प्रगतशील शेतकऱ्यांचा 'ओलम गौरव शिल्ड'ने सन्मान


या सोहळ्यात ओलम कंपनीच्या 'उन्नती ऊस विकास उपक्रमा'अंतर्गत प्रति हेक्टरी सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते 'ओलम गौरव शिल्ड' देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. यामध्ये सौ. रुक्मिणी विठ्ठल घुगरे (रा. महागाव, ता. गडहिंग्लज), गोपाळ पिराजी बेलगावकर (रा. बिजगर्णी, ता. जि. बेळगाव), अरुण जोतिबा पवार (रा. यशवंतनगर-कार्वे, ता. चंदगड),  बबन नागेंद्र आंबोलकर (वाघवडे), दुंडप्पा मलप्पा हेब्बाळे (बेणीवाड), श्रीशैल शिवमुर्तेप्पा बंदी (भडगाव), रवींद्र रमेश देशपांडे (चंदगड), अहमदझुबेर अब्दुलअजीज काझी (तळगुळी), विलास अर्जुन चौगुले (कोडोली), वैशाली महादेव निवगिरे (तुर्केवाडी), गायत्री गजानन देसाई (बेळवट्टी), पुंडलिक मष्णू मरणहोळकर (म्हाळेवाडी), अजितसिंह भय्यासाहेब शिंदे (नेसरी), वैशाली रघुनाथ पाटील (मळगेवाडी), अरुण बाळाप्पा चौगुले (तेरणी), गणपती नरसू पाटील (दूंडगे, ता. चंदगड), अजित कल्लोजी पाटील (चिचणे), मलप्पा भरमणी पाटील (देवगिरी), उत्तम तुकाराम मुरकुटे (मुरकुटेवाडी), विष्णू यल्लाप्पा पाटील (सरोळी), रुकमाना जोतिबा पाटील(पोरेवाडी), नंदा उमेश होसूर (बिडी) यांचा समावेश आहे.



यावेळी ओलम कंपनीचे डेप्युटी कंट्री हेड नितीन गुप्ता, ग्लोबल फायनान्स कंट्रोलर (सिनिअर व्ही.पी.) रामरत्नम, सेफ्टी ग्लोबल हेड सुमेरवंत सिंग, अथणी शुगरचे अध्यक्ष योगेश पाटील, अथणी कारखान्याचे कार्यकारी संचालक चंदन शेरगावकर, गुरुदत्त शुगर कारखान्याचे अध्यक्ष घाटगे, शिव कुमार, साहित्य फोगत, कॉर्पोरेट एच.आर. हेड आदित्य चौधरी, कॉर्पोरेट फायनान्स हेड सुमित ग्रोवर, एच.आर. मिस रेणू, डिस्टिलरी हेड नरेंद्र रावत, इंजिनिअरिंग हेड राजेश, प्रोसेस हेड योगेश, केन हेड सुधीर पाटील, फायनान्स हेड सदाशिव गणी, युनिट एच.आर. सचिन पाटील, युनियन अध्यक्ष संतराम गुरव, सचिव रवळनाथ देवण यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, कामगार, शेती अधिकारी, शेतकरी व तोडणी-वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक युनिट हेड राधाकृष्णन यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डिस्टिलरी हेड  नरेंद्र रावत यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.